ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानच्या पेशावर शहरातील एका मदरशात झालेल्या भीषण स्फोटात 5 जण ठार झाले. तर 50 जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमींमध्ये दोन शिक्षक आणि 20 लहान मुलांचा समावेश आहे.
वरिष्ठ पोलीस अधीक्षक मन्सूर अमान यांनी या स्फोटाला दुजोरा दिला आहे. प्राथमिक अहवालानुसार स्फोटात 5 किलो सुधारित स्फोटक उपकरणाचा (आयईडी) वापर करण्यात आला होता. पोलिसांनी या परिसराला घेराव घातला असून, पोलीस याचा तपास करत आहेत.
दरम्यान, लेडी रीडिंग हॉस्पिटलचे प्रवक्ते मोहम्मद असीम यांनी सांगितले की, 7 मृतदेह आणि 70 जखमींना या रुग्णालयात आणण्यात आले आहे.









