ऑनलाईन टीम / लीमा :
दक्षिण अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीला लागून असलेल्या पेरू या देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या जगात सर्वाधिक आहे. पेरूमध्ये कोरोनाचा 88.40 टक्के मृत्युदर आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत अमेरिका, ब्राझील, भारत आणि रशिया जगात आघाडीवर आहेत. त्यानंतर पेरूचा पाचवा नंबर लागतो. मात्र, तसे असले तरी लोकसंख्येनुसार अमेरिका, ब्राझील, भारत नव्हे तर पेरू या देशात कोरोनाचे सर्वाधिक बळी गेले आहेत.
पेरूमध्ये 6 लाख 47 हजार 166 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यामधील 4 लाख 55 हजार 457 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 1 लाख 62 हजार 921 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर 28 हजार 788 जणांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यूदर 88.40 टक्के आहे, असे जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने म्हटले आहे.
अमेरिकेत 61 लाख 73 हजार 653 जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यामधील 34 लाख 25 हजार 814 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर 1 लाख 87 हजार 226 रुग्ण दगावले. ब्राझीलमध्ये 38 लाख 62 हजार 311 जणांना कोरोनाची बाधा झाली. 30 लाख 31 हजार 559 रुग्ण बरे झाले. तर 1 लाख 20 हजार 896 जणांचा कोरोनाने बळी घेतला.









