ऑनलाईन टीम / प्रेटोरिया :
दक्षिण अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीला लागून असलेल्या पेरू या देशात 7 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पेरूमध्ये आतापर्यंत 8 लाख 28 हजार 169 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामधील 7 लाख 06 हजार 223 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
पेरूमध्ये रविवारी 3 हजार 184 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 77 जणांचा मृत्यू झाला. सध्या 89 हजार 204 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 1287 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 32 हजार 742 जणांचा मृत्यू झाला आहे.
पेरू हा देश कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत जगात सहाव्या स्थानी आहे. पेरूमध्ये आतापर्यंत 39 लाख 52 हजार 298 नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.