ऑनलाईन टीम / प्रेटोरिया :
दक्षिण अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीला लागून असलेल्या पेरू या देशात कोरोनाबाधितांच्या संख्येने 7 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. पेरूमध्ये आतापर्यंत 7 लाख 10 हजार 067 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामधील 30 हजार 344 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
पेरूमध्ये गुरुवारी 7 हजार 291 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 108 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 5 लाख 44 हजार 745 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. 1 लाख 34 हजार 978 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 1460 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
पेरू हा देश कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत जगात पाचव्या स्थानी आहे. पेरूमध्ये आतापर्यंत 34 लाख 57 हजार 205 नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत अमेरिका, भारत, ब्राझील आणि रशिया जगात आघाडीवर आहेत. त्यानंतर पेरूचा पाचवा नंबर लागतो.









