पेडणे / (प्रतिनिधी )
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ते विभाग पेडणेच्या हलगर्जीपणामुळे गतिरोधकावरील सफेद पट्टे रंगविले नसल्याने रविवारी 27 रोजी सकाळी 11.30 वाजता प्रज्ञा हायस्कूल देवसू जवळ दुचाकीवर मागे बसलेली महिला रस्त्यावर उसळून फेकून पडल्याने डोक्मयाला गंभीर इजा होऊन मोठय़ा प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने प्रमोधिनी प्रभाकर ठाकूर वय 55 वर्षे या निष्पाप महिलेचा मृत्यू झाला होता. यांची गंभीर दखल घेत पेडणे नागरिक समितीने मंगळवारी पेडणे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ते विभाग अभियंते लक्ष्मण नाईक यांना घेरावा घालून सार्वजनिक बांधकाम खाते रस्ते विभागाला जबाबदार धरून पेडणे तालुक्मयातील सर्व रस्त्यावर असलेले गतिरोधक यांना पट्टे मारुन व साईन बोर्ड लावावे अशी मागणी करत निवेदन दिले.
यावेळी पेडणे नागरिक समितीचे अध्यक्ष राजमोहन शेटय़?, सभासद वकिल प्रसाद शहापूरकर, वकिल व्यकंटेश नाईक, वकिल सीताराम परब ,वकिल जितेंद्र गावकर, सुर्यकांत चोडणाकर , महादेव गवंडी आदी उपस्थित होते.
सरकारच्या हलगर्जीपणामुळे गेला महिलेचा बळीः पेडणे नागरिक समिती
पेडणे तालुक्मयात असलेल्या गतिरोधकाचे रंग उडून गेल्याने अनेक अपघात आतापर्यंत झाले आहेत.माञ पेडणे सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागाला यांचे काहिच सोयरसुतक नाही. रविवारी देवसू येथे गतिरोधकामुळे झालेले अपघात विनाकारण महिलेचा बळी गेला आहे. संबंधित खात्याने पेडणे तालुक्मयातील गतिरोधकाचे रंगकाम उडून गेल्यामुळे हा अपघात घडला असल्याचे यावेळी नागरिक समितीच्या पदाधिका-यानी अभियंते श्री नाईक यांना सांगितले .
मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करणारः सीताराम परब
यावेळी वकिल सीताराम परब यांनी देवसू येथेगतिरोधक लक्षात न आल्याने एका महिलेचा रस्त्यावर पडून बळी गेला. जर गतिरोधक रंगविले असते तार चालकाच्या निदर्शनास गतिरोधक आला असता.यासाठी या अपघातास पूर्णपणे पेडणे सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागाला जबाबदार धरण्यात येणार असल्याचे सांगून मनुष्य वधाचा गुन्हा होऊ शकतो.जर येत्या पंधरा दिवसात पेडणे तालुक्मयातील सर्व गतिरोधक रंगवून साईन बोर्ड लावावे. जर यात हलगर्जीपणा झाल्यास अभियंते यांना जबाबदार धरत गुन्हा दाखल करणार असा इशारा दिला.
कोरगाव पंचायतीने पंचायत क्षेत्रातील गतिरोधक रंगविण्यासाठी पाच महिन्यापूर्वी पेडणे सार्वजनिक रस्ते विभागाला पञ पाठवूनही का कारवाई झाली नाही ?
कोरगाव पंचायत क्षेत्रातील रस्तावर असलेले गतिरोधकांवर सफेद पट्टे मारावे यासाठी कोरगाव पंचायतीने पेडणे सार्वजनिक बांधकामा खात्याच्या रस्ते विभागाला पञ पाठवून मागणी केली होती.माञ अजूनपर्यंत यावर संबधीत कार्यालयाकडून कार्यवाही का झाली नाही असा प्रश्न महादेव वांडी यांनी केला.
अपघातास कारणीभूत ठरवून पेडणे सार्वजनिक बांधकाम स्ते विभागाच्या अधिका-यावर मनुष्य वधाचा गुन्हा नोंद करावा
रविवारी देवसू येथे गतिरोधकावर आपघात घडून ज्या महिलेचा बळी गेला त्याला पूर्णपणे पेडणे सरकार बांधकाम रस्ते विभाग जबाबदार असून त्यांच्या हलगर्जीपणामुळे आज एका महिलेचा विनाकारण बळी गेला आहे.सरकार यंञणा किती सुस्त आणि बेफिकीर आहे याचा प्रत्यय आज आला असून जर गतिरोधक रंगविले असते तसेच साईनबोर्ड असते तर हा बळी गेला नसता. या आपघातास पेडणे सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागाला जबाबदार धरत संबंधित अधिकाऱयांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करता येते.जर अधिकाऱयांनी पेडणे तालुक्मयातील सर्व
गतिरोधक व साईन बोर्ड पंधरा दिवासांच्या आत न लावल्यास पेडणे सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागातील अभियंत्याना जबाबदार धरुन गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा दिला.
पंधरा दिवसांत पेडणेतील गतिरोधकांना पट्टे मारणारः आभियंते
यावेळी पेडणे सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागातील अभियंते लक्ष्मण नाईक यांनी समितिला गतिरोधक रंगविण्यासाठी आणलेले रंग यांचे ढबे दाखविले.व लवकर पंधरा दिवसात हे काम करुन घेतो त्यानंतर निविदा काढून पेडणे तालुक्मयातील सर्व गतिरोधकावर चांगल्या प्रतीचा रंग व थर्सल रंग पट्टय़ा मारण्यासाठी कंञाट देणार असल्याचे आश्वासन समितीला दिले.









