पेडणे (प्रतिनिधी )
पेडणेतील प्रसिद्ध पुनवेला दरवषी गोव्याच्या विविध भागातून आणि महाराष्ट्रात कर्नाटक तसेच इतर राज्यात हजारो भाविक पेडणेतील पुनवेला येऊन देव दर्शन तसेच देवाचा कौल घेतात.यंदा माञ शेकडो वर्षांची परंपरा असलेला या दसरोत्सव व पुनव उत्सवावर कोरोना संकट असल्याने सरकारने घालून दिलेल्या नियमानुसार यंदा हा उत्सव देवस्थान समितीने साजरा करण्याचा निर्णय घेतल्याने भाविक खूपच मर्यादित स्वरुपात आले. दरवषी गजबजलेला मंदिर परिसर तसेच देवाचा मांगर येथे गर्दी दिसली नाही.
भाविकांनी घेतले मुक दर्शन
गोव्याच्या विविध भागातून आलेल्या भाविकांनी श्री भगवती , श्री देव रवळनाथ तसेच देवाचा मांगर येथे जाऊन रवळनाथ व भूतनाथ देवाच्या तरंगाचे दर्शन घेतले.









