पेठ वडगाव / प्रतिनिधी
पेठ वडगाव येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व व श्री महालक्ष्मी देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीपसिंह बळवंतराव यादव यांचे ७२ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरातून शोक व्यक्त करण्यात आला. युवक क्रांती महाआघाडीचे नगरसेवक गुरुप्रसाद यादव यांचे वडील व गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांचे ते सासरे होत.
पेठ वडगाव येथील श्री महालक्ष्मी दूध संस्था, जय महालक्ष्मी कुक्कुटपालन सहकारी संस्था, श्री महालक्ष्मी सहकारी पतसंस्था, पेठ वडगाव शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थांची दिलीपसिंह यादव यांनी स्थापना केली. श्री दिलीपसिंह यादव माध्यमिक विद्यालय, पेठ वडगाव या विद्यालयाच्या उभारणीमध्ये त्यांचे खूप मोठे मोलाचे योगदान होते.
तसेच त्यांनी वडगाव नगरपरिषदेमध्ये नगरसेवक व उपनगराध्यक्ष म्हणूनही प्रभावीपणे कार्य केले.पेठ वडगावची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवस्थान व्यवस्थापन समिती, पेठ वडगाव या समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.
यामध्ये मंदिरातील सार्वजनिक दीपोत्सव, चांदीची पालखी व नवरात्र पालखी महोत्सव या सुधारणा त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केल्या.स्वामी रामकृष्ण परमहंस अध्यात्मिक मिशनच्या माध्यमातून त्यांनी प्रचार व प्रसाराचे कार्य उत्तमपणे पार पाडले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी दिपलक्ष्मी यादव, मुलगा नगरसेवक गुरुप्रसाद यादव, अर्जुनसिंह यादव, मुलगी प्रियांका यादव-पाटील, जावई संदीप पाटील (पोलीस उपमहानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र), दोन सुना व तीन नातवंडे असा परिवार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









