प्रतिनिधी / पेठ वडगाव
वडगावच्या नागरीकांनी मला भर-भरून प्रेम दिले आहे. याचा विसर कधी पडू देणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी पंचवीस लाख निधी दिला. याच पध्दतीने शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन आमदार राजूबाबा आवळे यांनी केले.
येथील बिरदेव चौकातील कोळी गल्लीतील रस्त्याच्या कामाचा शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी नगराध्यक्ष मोहनलाल माळी,उपनगराध्यक्ष शरद पाटील, नगरसेवक अजय थोरात, नगरसेविका अनिता चव्हाण, ,नगरसेविका मैमून कवठेकर,नगरसेवक संदीप पाटील, शरद गुरव, वडगाव शहर काँग्रेस अध्यक्ष सचिन चव्हाण होते.
यावेळी नगराध्यक्ष मोहनलाल माळी म्हणाले, आमदार राजुबाबा यांचे वडील जयवंतराव आवळे यांनी वडगाव शहरास भरपूर दिले.आज त्यांचा वारसा राजुबाबा चालवत आहेत.कोरोनाच्या पार्श्वभुमीवर निधी कमी असताना आमदार राजूबाबा यांनी विकासासाठी निधी दिला आहे.याप्रसंगी राहुल माने आदी. पदाधिकारी उपस्थित होते.








