प्रतिनिधी / पेठ वडगाव
पेठ वडगाव बाजार समितीच्या आवारात सोमवारी भरविला जात असलेल्या जनावरांच्या बाजारात सोशल डीस्टन्सचे पालन केले जात नाही. मास्कचा वापर केला जात नाही. पालिकेने कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळले जात नाहीत. यामुळे सोमवार जनावरांचा बाजार बंद करावा असे पत्र पालिका मुख्याधिकारी सुषमा कोल्हे यांनी वडगाव बाजार समितीस दिले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वडगाव बाजार समितीचा सोमवारी भरला जात असलेला जनावरांचा बाजार बंद ठेवण्यात आला होता. बाजारसमितीच्या मागणीनुसार वडगाव पालिकेने या बाजारात कोरोनाचा संसर्ग होऊ नये याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना देवून जनावरांचा बाजार भरविण्याबाबत परवानगी दिली होती. गेले दोन आठवडे जनावरांचा बाजार भरत आहे.
मात्र जनावरांचा बाजार भरविल्यामुळे जिल्ह्यातील विविध भागातून या ठिकाणी लोक येत आहेत. या ठिकाणी सोशल डीस्टन्सचे पालनही केले जात नाही. येथे जनावर व्यापारी मास्कही वापरत नाहीत. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे या बाजारात पालन केले जात नसल्याबाबत या भागातील नागरिकानी तक्रारी केल्या होत्या. या बाबत या भागातील नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असताना जनावरांचा बाजार भरवता आहात या बाजारामुळे कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्याचा खर्च तुम्ही घालणार असाल तरच जनावरांचा बाजार सुरु करा अशी भूमिका मांडून बाजार समितीकडे हा बाजार बंद करण्याची मागणी केली होती.
तर वडगाव पालिकेच्या सभेत कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता या बाजाराला परवानगी दिल्याने या परिसरात यादव कॉलनी, इंदिरा कॉलनी अशा नागरी वस्ती असून बाजारात परगावाहून विविध भागातून आलेल्या लोकातून कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो याला जबाबदार कोण असा सवाल नगरसेवकांनी उपस्थित करून जनावरांचा बाजार भरविणे धोक्याचे असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. यामुळे पालिकेच्या मुख्याधिकारी सुषमा कोल्हे यांनी आज वडगाव बाजार समितीला जनावरांचा बाजार बंद ठेवण्याबाबतचे पत्र दिले असून बाजार भरविल्यास व त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाल्यास बाजार समिती जबाबदार राहील असे नमूद केले आहे.
दरम्यान यापुढे आम्ही कोरोनाचा संसर्ग होऊ नये याबाबत सर्व नियम काटेकोर पाळून व योग्य ती खबरदारी घेवून जनावरांचा बाजार भरवू अशी भूमिका वडगाव बाजार समितीकडून पालिका प्रशासनाकडे मांडली असून या बाबत येत्या दोन दिवसात पालिका प्रशासन व बाजार समितीची बैठक होणार असल्याचे समजते. या बैठकीतील निर्णयावरच हा बाजार सुरु राहणार की बंद राहणार यावर निर्णय होऊ शकतो असे चित्र आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








