प्रतिनिधी / पेठ वडगाव
वडगाव पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी सत्ताधारी युवक क्रांती महाआघाडीचे नगरसेवक व मनसेचे शहराध्यक्ष संतोष चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. उपनगराध्यक्ष निवड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मोहनलाल माळी होते. मुख्याधिकारी योगेश कदम यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
पेठ वडगाव पालिकेच्या उपनगरांध्यक्षपदाचा कार्यकाल पूर्ण होताच उपनगराध्यक्ष शरद पाटील यांनी महाआघाडीत ठरलेल्या निर्णयानुसार आपल्या पदाचा राजीनामा नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांचेकडे सोपविला. यानंतर महाआघाडीच्या कोअर कमिटीत झालेल्या निर्णयानुसार महाआघाडीच्या नेत्या प्रविता सालपे यांनी नगरसेवक संतोष चव्हाण यांचे नाव उपनगराध्यक्षपदासाठी गेल्या दोन दिवसापूर्वी घोषित केले होते. याप्रमाणे आज नूतन उपनगराध्यक्ष निवड कार्यक्रमात सत्ताधारी युवक क्रांती महाआघाडीचे नगरसेवक संतोष चव्हाण यांचा अर्ज मुख्याधिकारी योगेश कदम यांचेकडे दाखल करण्यात आला. उपनगराध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने नगरसेवक संतोष चव्हाण यांची निवड बिनविरोध घोषित करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी पालिका चौकात शांततामय वातावरणात आनंदोत्सव साजरा केला. निवडीसाठी महाआघाडीचे संघटक व नगरसेवक अजय थोरात हे सूचक तर अनुमोदक नगरसेवक संतोष गाताडे होते.
नूतन उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण म्हणाले, स्वर्गीय शिवाजीराव सालपे, दिलीपसिंह यादव, विश्रांत माने, महाआघाडीच्या नेत्या प्रविता सालपे, ज्येष्ठ मार्गदर्शक आर.डी.पाटील, रंगराव बावडेकर, सुकुमार पाटील, बाळासो पाटील तसेच नगराध्यक्ष मोहनलाल माळी, महाआघाडीचे संघटक अजय थोरात यांचेसह सर्व आजी-माजी नगरसेवक, मार्गदर्शक, पदाधिकारी, कार्यकर्ते कार्यरत आहोत. युवक क्रांती महाआघाडीने सत्ताकाळात शहरात कोट्यावधीची विकासकामे केली आहेत. या पुढे ही आम्हाला शहरात विविध विकासकामे, शासन उपक्रम राबविण्यासाठी साथ द्या असे आवाहन करून वडगाव शहराच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचे संतोष चव्हाण यांनी सांगितले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष असलेले नगरसेवक संतोष चव्हाण हे वडगाव शहरात सर्वसामान्य जनतेच्या विविध प्रश्नासाठी झटणारे, सामाजिक कार्यात अग्रेसर असे चळवळीतील नेतृत्व आहेत.
शहरातील विविध समस्या, नागरी प्रश्नाबाबत त्यांनी अनेक लक्षवेधी आंदोलने करून प्रशासनाला जाग आणून सर्वमान्य जनतेला न्याय मिळवून दिला आहे.तर युवक क्रांती महाआघाडीचे निष्ठावंत नगरसेवक म्हणून एकनिष्ठ राहिले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर संतोष चव्हाण यांना महाआघाडीने उपनगराध्यक्षपदाची संधी दिल्याबद्दल मनसे कार्यकर्ते व नागरीकातून समाधान व्यक्त करण्यात आले. फटाक्याची आतिषबाजी करून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी युवक क्रांती महाआघाडीच्या नेत्या प्रविता सालपे, नगरसेवक अजय थोरात, यांचेसह महाआघाडीचे पदाधिकारी व आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









