प्रतिनिधी / पेठ वडगांव
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या मानाच्या इमामे हुसेन बादशहा सवारीची धार्मिक विधी मध्ये स्थापना करण्यात आली. सालाबादप्रमाणे याही वर्षी हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या मानाच्या इमामे हुसेन बादशाहा सवारी (तक्का पीर) स्थापना धार्मिक विधीमध्ये करण्यात आली.
या वर्षी कोरोना महामारीमुळे मोहरम उत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरले आहे. दरवर्षी मोहरम उत्सवातील पहिली मानाची भेट बेबी फातिमाँ (मसूद माँ) व दुसरी मानाची भेट झिमझीम साहेब सवारीशी होते. या मानाच्या भेटी, विसर्जन कार्यक्रम कोरोना महामारी मुळे मोहरम कमिटी उत्सव व वडगाव पोलीस ठाण्याच्या बैठकीत ठरल्यानुसार रद्द करण्यात आले असल्याची माहिती आदिलशहा फकीर यांनी दिली. या सवारीची देखभाल आदिलशहा फकीर व राजू फकीर, कबीर फकीर घेतात व हजेरी अरुण पाडळकर व रमेश माळी हे घेतात.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









