प्रतिनिधी / पेठ वडगाव
पेठ वडगाव शहरात दिवसेंदिवस विविध भागात कोरोना रुग्ण सापडत आहेत. रुग्णांची संख्या शहरात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात रविवार दि.९ ते मंगळवार ११ ऑगष्ट हे तीन दिवस लॉकडाऊन करण्यात आला असल्याची माहिती पालिका मुख्याधिकारी सुषमा कोल्हे यांनी दिली .
पेठ वडगाव शहरात कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी बुधवार दि.५ ते दि.८ तारखेपर्यंत संपुर्ण लॉकडाऊन करण्यात आला होता. यानंतरही गेल्या तीन दिवसात शहरात विविध भागात कोरोना रुग्ण वाढले आहेत. यामुळे शहरात तीन दिवस पुन्हा लॉकडाऊन वाढविण्यात येत आहे. यामध्ये थोडी शिथिलता करण्यात आली आहे.
या बाबत माहिती देताना मुख्याधिकारी म्हणाल्या. संपूर्ण शहरात दक्षता घेणेच्या दृष्टीने प्रशासनाचे वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पुढील तीन दिवसाच्या लॉकडाऊन मध्ये प्रतिबंधीत क्षेत्र वगळता दिनांक ९ पासून दिनांक ११ ऑगष्टपर्यंत तीन दिवसामध्ये मेडीकल, हॉस्पीटल सेवा चालू राहतील तसेच अत्यावश्यक सेवा या मध्ये दुध विक्री सकाळी सहा ते नऊ व सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत चालू राहील.
तसेच किराणा दुकान, धान्य दुकाने, बेकरी, मटण, चिकन दुकाने सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत चालू राहतील. वरील व्यवसाय आस्थापना वगळून सर्व आस्थापना बंद राहतील. यानंतर सर्व आस्थापना चालू करणे बाबतचे पुढील आदेश वरील मुदती नंतर दिले जातील असे मुख्याधिकारी यांनी सांगितले.
प्रतिबंधित क्षेत्रामधील नागरीकांनी घरा बाहेर पडू नये, तसेच बाहेरील नागरीकांनी प्रतीबंधीत क्षेत्रामध्ये जावू नये, जीवनावश्यक व आरोग्याची कारणे वगळून ६५ वर्षावरील व्यक्ती, गंभीर आजार असलेल्या व्यक्ती, गर्भवती स्त्रीया व लहान मुले यांना घराबाहेर पडणे प्रतिबंधीत असेल. अंत्यविधी कार्यक्रम २० नातेवाईक अथवा नागरीक यांचे उपस्थितीत करणे बंधनकारक राहील.
सार्वजनिक ठिकाणी पान, गुटखा, तंबाखू, सुपारी खाणे व थुंकणे प्रतिबंधीत असेल, कंटेन्मेंट झोन क्षेत्रात फक्त वैद्यकीय कारण आणि अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा वगळता अन्य कोणत्याही कारणासाठी या क्षेत्रात लोकांना घराबाहेर जाण्या-येण्यास प्रतिबंध आहे.
याचबरोबर वडगांव शहराच्या आजू – बाजूच्या ग्रामीण भागामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढत असलेने वडगांव शहरामधील छत्रपती शिवाजी भाजी मार्केट व शहरामधील बैठे भाजी विक्री बंद ठेवणेत आलेली आहे. ज्या भाजीपाला विक्रेत्यांचे मालकीचे व भाडयाचे घरे असतील तर त्यांनी आपल्या राहत्या घरामध्येच भाजी पाला विक्री करणेचा आहे. अथवा शहरामध्ये वाहनामधून अथवा फिरता गाडयावरुन भाजीपाला विक्री करणेचा आहे.
शहराच्या आजू – बाजूच्या बाधीत ग्रामीण भागामधील भाजीपाला विक्रेते यांना वडगांव शहरामध्ये भाजी पाला विक्रीस बंदी असणार आहे. ज्या ग्रामीण भागामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नाही अशा व्यापारी यांना भाजीपाला विक्री करीता परवानगी राहील पण त्यांनी आपले आधारकार्ड स्वता जवळ ठेवणे बंधनकारक राहील. सर्व व्यापारी यांनी मास्क, हॅन्डग्लोज व सॅनिटायजरचा वापर करणे बंधनकारक राहील.
सर्व नागरीक यांनी मास्क व सोशलडिस्टन्स ठेवणे बंधनकारक राहील. ज्या व्यापारी व नागरीक यांचेकडून नियमांचे उल्लंघन होईल त्यांचेवर कडक दंडात्मक कारवाई करणेत येईल.तसेच वरील नियमांचे उल्लंघन होत असलेचे निदर्शनास आलेस तात्काळ मार्केट व दुकाने बंद करणेचे आदेश देण्याचा इशारा मुख्याधिकारी यांनी दिला आहे.
याचबरोबर वडगांव शहरामधील सापडलेल्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कामध्ये आलेल्या नातेवाईक अथवा नागरीक यांनी आपली नावे प्रभाग समिती किंवा नगरपालिका प्रशासनास कळविणेत यावे. जेणे करुन शहरामध्ये कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव टाळता येईलअसे आवाहन वडगांव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मोहनलाल माळी, उपनगराध्यक्ष शरद पाटील, मुख्याधिकारी सुषमा शिंदे-कोल्हे यांनी केले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








