प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरातील मांडवी समुद्रकिनारी सोमवारी सायंकाळच्या सुमारास प्रौढाचा मृतदेह आढळून आल्याने नागरिकांत चर्चेला उधाण आल़े या दिवशी दुपारी भाटय़े पुलाखालील पाण्यात मच्छिमारांना हा मृतदेह तरंगताना †िदसून आला होत़ा मात्र उधाणलेल्या पाण्यात गायब झालेला मृतदेह सायंकाळी पेठकिल्ला समुद्रकिनारी मृतदेह आढळून आल़ा
संजय तुकाराम सावंत (45, ऱा कर्ला रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आह़े पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सावंत हे रविवार पासून राहत्या घरातून बेपत्ता झाले होत़े याप्रकरणी नातेवाईकांनी बेपत्ता झाल्याची खबर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली होत़ी दरम्यान सोमवारी दुपारी भाटय़े पुलावर मच्छिमारी करण्यासाठी गेलेल्या तरूणांना मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला होत़ा या घटनेची तात्काळ खबर रत्नागिरी शहर पोलिसांना देण्यात आली होत़ी
मात्र उधाणलेल्या पाण्यामुळे मृतदेह नजरेआड गेल़ा यावेळी पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात मृतदेहाचा शोध कायम ठेवल़ा अखेर सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास पेठकिल्ला याठिकाणी सावंत यांना मृतदेह स्थानिकांना मिळून आल़ा यावेळी नातेवाईकांना बोलावून मृताची ओळख पटवून घेण्यात आल़ी याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े पुढील तपास करण्यात येत आह़े









