सातारा/ प्रतिनिधी
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र विविध नियम व अटी लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे गर्दी होणाया ठिकाणी याची अधिक दक्षता घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर पेट्रोल पंपावर देखील काही ठराविक सेवा बजावणाया व्यक्तींना पेट्रोल देण्यात येत आहे. तसेच पेट्रोल देण्याची वेळ देखील निश्चित करण्यात आली आहे. याकरिता कार्डधारकांची योग्य ती चौकशी करूनच पेट्रोल देण्यात यावे असे आदेश देखील जारी करण्यात आले आहेत.
पण काही नागरिक बोगस कार्ड दाखवून पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावरून गर्दी करत आहेत. याबाबत चौकशी केली असता किंवा पेट्रोल पंपावर कार्य करणाया कर्मचायांनी कार्ड बाबत अधिक विचारपूस केली असता, त्या कर्मचायाने बरोबर हुज्जत घालत आहेत. जवळपास सर्वात पेट्रोल पंपावर घटना, पाहावयास मिळत आहेत. याकरिता प्रशासनाने आता सर्वच पेट्रोल पंपावर शहर पोलीस तैनात केले आहेत. जेणेकरून पेट्रोलपंपावर होणारे हे वाद टाळावे, तसेच अशा प्रकारच्या बोगस कार्ड धारकांवर कारवाई देखील करण्यात येत आहे.








