ओरोस/प्रतिनिधी-
ओरोस खर्येवडी येथील सिधी पेट्रोल पंपावर ५७ हजार रुपयांची रोकड लंपास केल्या प्रकरणी संशयितांच्या पोलीस कोठडीत मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी आणखी २ दिवसांची वाढ केली आहे.
शनिवारी सकाळी ही घटना घडली होती. त्यानंतर त्यांना वैभववाडी चेक पोष्टवर पोलिसांनी अटक केली असून त्याच दिवशी न्यायालयाने त्यांना ४ तारीख पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
अब्दुल रजाक अब्दुल हमीद खान (35), मीर बादशाह शेख (24), प्रमोद प्रकाश गायकवाड (37), सोहेल युनुस काझी (26), राजेश गुणाजी मासवकर (34) अशी संशयितांची नावे असून हे संशयित विक्रोळी पार्कसाईट व घाटकोपर मुंबई येथील राहणारे आहेत.









