प्रतिनिधी / सोलापूर
दररोज इंधनच्या दरांमध्ये वाढ होत आहे. पेट्रोलचे दर रु ९० च्या पलीकडे व डिझेल चे दार रु. ७५ च्या पलीकडे पोहोचलेले आहेत. जनतेला ह्या वाढत्या इंधन दरांमुळे महागाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आज गुरुवारी आम आदमी पार्टीच्यावतीने पेट्रोल दरवाढ विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आमचे पदाधिकाऱ्यांनी सायकलवर बसून पेट्रोल दरवाढीचा विरोध केला.
जनतेतून असा सवाल उपस्थित होत आहे कि, २०१४ मध्ये जेव्हां हे केंद्र सरकार स्थापन झाले होते. त्यावेळी कच्च्या तेलाची किंमत ११० डॉलर प्रति बॅरल होते आणि पेट्रोल चे दर प्रति लिटर रु ७१ होते. आता कच्च्या तेलाची किंमत ३९ डॉलर प्रति बॅरल आहे. मात्र पेट्रोल चे दर प्रति लिटर रु ९१ आहे. ह्या रु ९१ प्रति लिटर पेट्रोल च्या दरात रु ६४ हे टॅक्स च्या रूपात आकारले जात आहेत.
आपल्या देशात एक देश एक टॅक्स असे सांगून जीएसटी लावण्यात आले. पण वरील इंधन वर जीएसटी नसून वेगवेगळ्या टॅक्सच्या रूपात जवळपास ६९% वसूल केले जातात. जर इंधन वर अधिकाधिक जीएसटी जे २८% आहे, ते जरी आकारण्यात आले तरी सध्या चे दर हे खूपच कमी होतील. अशी जनतेतून प्रतिक्रिया येत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत जनतेची ही आवाज पोहोचविण्यात यावी आणि दर रोज होत असलेले इंधन दरवाढवर आळा बसवून त्या सोबत होणाऱ्या महागाईवर ही सरकारने नियंत्रण ठेवावे. अशी कळकळीची विनंती करण्यात आली. ह्या वेळी आम आदमी पार्टी शहर अध्यक्ष मो. अस्लम शेख, पश्चिम महाराष्ट्र संगठन मंत्री सागर पाटील, रोबर्ट गौडेर, निहाल किरनळ्ळी, नासीर मंगलगिरी, इल्यास शेख, बाबा सगरी, मशाक कारभारी, रहीम शेख, असद खतीब, असिफ शेख आदी उपस्थित होते.









