पेट्रोल 35 तर डिझेल 18 पैशांनी महाग
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
तेल कंपन्यांनी रविवारी पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ केली आहे. नव्या दरवाढीमुळे राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत 35 पैसे प्रतिलिटरने वाढून 99.51 वर पोहोचली आहे. तर डिझेल दर 18 पैशांनी महाग झाल्याने दर 89.36 रुपयांवर पोहोचला आहे. तसेच आता मुंबईत पेट्रोल 105.58 रुपये प्रतिलिटर झाले आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलने शंभरीपार झेप घेतली असून 100.44 रुपये प्रतिलिटरपर्यंत मजल गाठली आहे. तसेच डिझेलची किंमत 93.91 प्रतिलिटर झाली आहे. चेन्नईप्रमाणेच दिल्ली आणि कोलकातामध्येही पेट्रोल दर लवकरच शतक गाठण्याची शक्मयता आहे. कोलकातामध्ये रविवारी पेट्रोल 99.45 रुपये आणि डिझेल 92.27 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात होते. नव्या वाढीसह पेट्रोलची किंमत संपूर्ण देशात विक्रमी दर गाठण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, केरळ, आंध्रप्रदेशातील बहुतांश भागात पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे.









