नवी दिल्ली / वृत्तसंस्था
तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल या दोन्हींच्या किंमती शुक्रवारी कमी केल्या आहेत. पेट्रोलचे दर प्रतिलिटर 23 ते 26 पैशांपर्यंत खाली आले असून डिझेलची किंमत प्रतिलिटर 33 ते 37 पैशांनी उतरली आहे. यापूर्वी गुरुवारी पेट्रोल-डिझेल दरात कपात झाली होती. सलग दुसऱया दिवशी इंधन दरात कपात झाल्याने वाहनधारकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर पाहून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात. इंधन किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.









