देशात 135 जिल्हय़ांमध्ये पेट्रोल दर ‘शंभरी’पार- इंधन दराच्या भडक्याने महागाईच्या झळा तीव्र
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती शुक्रवारी पुन्हा भडकल्या. देशाची आर्थिक राजधानी मुंबईपाठोपाठ देशातील 135 जिल्हय़ांमध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटर शंभरीच्या पुढे गेले आहेत. राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 29 पैशांनी वाढून 95.85 रुपये प्रतिलिटर झाला आहे. त्याचबरोबर डिझेलचा दर प्रतिलिटर 28 पैशांनी वाढून 86.75 रुपये प्रतिलिटर झाला आहे. तर, मुंबईत पेट्रोल 102 रुपये प्रतिलिटर झाले आहे. दरम्यान, दिवसेंदिवस वाढत जाणाऱया इंधन दरांमुळे आता महागाईचा भडका उडण्याची चिन्हे दिसत आहेत. या वाढत्या दरांमुळे देशात ठिकठिकाणी विरोधी पक्षांसह सर्वसामान्य नागरिकांकडून तीव्र आंदोलनही केले जात आहे.
सरकारी तेल कंपन्या दरांचा आढावा घेतल्यानंतर दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले जातात. शुक्रवारी सकाळी जाहीर झालेल्या दरांनुसार आता मुंबईत 1 लिटर पेट्रोलची किंमत 102.04 रुपये आहे. त्याचबरोबर 1 लिटर डिझेल प्रतिलिटर 94.15 रुपये आहे. कोलकातामध्ये आता पेट्रोलची किंमत 95.80 रुपये तर डिझेल प्रतिलिटर 89.60 रुपये झाले आहे. चेन्नईत 1 लिटर पेट्रोलची किंमत 97.19 रुपयांवर पोहोचली असून डिझेल प्रतिलिटर 91.42 रुपये दराने विकले जात आहे.
मे महिन्यात 16 वेळा, जूनमध्ये 6 वेळा वाढ
मुंबईत पेट्रोलचे दर प्रतिलिटर 102 रुपयांच्या पुढे गेले आहेत. तर डिझेलची किंमत 94 रुपयांच्या पुढे गेली आहे. जूनमध्ये आतापर्यंत किंमतीत 6 वेळा वाढ झाली आहे. जूनमध्ये पेट्रोल 1.66 रुपयांनी महाग झाले आहे, तर डिझेल 1.60 रुपयांनी महाग झाले आहे. त्यापूर्वी मे महिन्यात पेट्रोल 4.09 रुपयांनी महागले. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती मे महिन्यात 16 वेळा वाढविण्यात आल्या. शुक्रवारीही पेट्रोल 25-29 पैसे प्रतिलिटर महाग झाले आहे, तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 27-30 पैसे वाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाची किंमत प्रतिबॅरल 72 डॉलरच्या वर गेल्यामुळे किंमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्मयता आहे.
निवडणुकांदरम्यान किंमती स्थिर मागील पाच-सहा महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती मोठय़ा प्रमाणात वाढल्या आहेत. चालू वर्षात पेट्रोलच्या किंमतीत सुमारे 14 टक्क्मयांनी वाढ झाली आहे. मात्र आतापर्यंत केवळ 4 वेळा कपात झाली आहे. मार्च आणि एप्रिलमध्ये पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांदरम्यान किंमती स्थिर राहिल्या. त्याऐवजी मार्चमध्ये तीनवेळा आणि एप्रिलमध्ये एकदा दरात घट झाली होती. मात्र, मे महिन्याच्या प्रारंभी निकाल जाहीर झाल्यानंतर पुन्हा








