आंदोलनादरम्यान, कोरोना नियमांचे उल्लंघन…
ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वात जास्त असलेल्या मुंबई शहरात पुन्हा एका कोरोना नियमांचा फज्जा उडताना दिसून आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजूनही महाराष्ट्रात निर्बंध जारी आहेत. अशातच मुंबई शहरात शनिवारी पेट्रोल – डिझेलच्या वाढत्या किंमतीवरून युथ काँगेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन केले.

यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यकर्त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीला विरोध दर्शवत केंद्र सरकारच्या विरोधात नारेबाजी केली. दरम्यान, भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन करत असलेल्या 40 ते 50 कार्यकर्त्यांना आणि काँग्रसचे आमदार जीशान सिद्दीकी यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
प्रदर्शना दरम्यान ,पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भाजप कार्यालयाबाहेर बॅरीकेड्स लावत पुढे जाण्यापासून रोखले. या आंदोलनाचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला असून यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे की कोरोनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे, त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.









