ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
शुक्रवारी देशातील इंधनाचे दर स्थिर होते. एका दिवसाच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. 22 मार्चपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7.20 रुपयांची वाढ झाली आहे.
आयओसीएलने दिलेल्या माहितीनुसार, आज पेट्रोलमध्ये 80 पैशांची तर डिझेलमध्ये लिटरमागे 85 पैशांची वाढ झाली आहे. नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.61 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेल 93.87 रुपये प्रति लिटर झाले आहे. मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर 117.57 रुपये. तर डिझेलचा दर वाढून 101.79 रुपये झाला आहे.
दरम्यान, दिल्लीत सीएनजी गॅस प्रती किलो 80 पैशांनी महागला आहे. तर घरगुती वापराच्या पाईप गॅसच्या दरात 5 रुपये प्रती क्युबिक मीटर वाढ करण्यात आली आहे.









