प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊनच्या निर्णयानंतर सर्वच वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली. नागरिकांना घरी राहण्याचे आदेश देण्यात आले. यामुळे पेट्रोल व डिझेलच्या विक्रीत कमालीची घट झाली आहे. शहरात पेट्रोल व डिझेलची विक्री 80 टक्क्मयांनी कमी झाली आहे. त्यामुळे शहरातील पेट्रोल पंपांवर शुकशुकाट पसरला आहे.
अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वच सेवा ठप्प आहेत. महामार्गावरून होणारी वाहतूकही बंद करण्यात आली होती. त्यामुळे रस्त्यावरून धावणाऱया दुचाकी, चार चाकी वाहनांची संख्या कमी झाली. यामुळे इंधनाची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे पेट्रोल पंपांवरील कर्मचाऱयांना दिवसभर ग्राहकांची वाट पाहत बसावे लागत आहे. काही पंपांवर केवळ 50 टक्के कर्मचारी कार्यरत आहेत.
पंपांवर हवे वेळेचे बंधन
पेट्रोल पंपांवर दुपारपर्यंतच वाहनचालक येत आहेत. सध्यातरी वाहनांची संख्या अत्यंत कमी झाली आहे. त्यामुळे सकाळी 2 तास व सायंकाळी 2 तास पेट्रोलपंप सुरू केला तरी वाहत्रुकीच्यादृष्टीने चालू शकते. दिवसभर बसून राहण्यापेक्षा हा पर्याय उत्तम असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पेट्रोलपंप चालकांकडून वेळेचे बंधन ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे.
महेंद्र देशपांडे (संचालक – देशपांडे पेट्रोलिअम)
पेट्रोल व डिझेलची मागणी घटली आहे. अत्यावश्यक सेवा पुरविणाऱया व्यतिरिक्त इतर वाहनांची संख्या कमी झाली आहे. एकूण 80 टक्के विक्री मंदावली आहे. सकाळी 11 पर्यंतच थोडीफार वाहने येतात. त्यानंतर दिवसभर कोणीच ग्राहक नसल्याने रिकामी बसण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले.
समीर (पेट्रोलपंप कर्मचारी)
पेट्रोल व डिझेल या अत्यावश्यक सेवा असल्यामुळे आम्हाला नागरिकांसाठी कामावर यावेच लागते. घरचे कामावर जावू नका, असे सांगत असतानाही कामावर यावे लागते. येतेवेळी प्रसंगी पोलिसांकडून मारही खावा लागतो. परंतु ही लोकांची सेवा असल्याने ती करण्यात आनंद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.








