ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या असताना जनतेला दिलासा देण्यासाठी अर्थ मंत्रालय पेट्रोल-डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी करण्याचा विचार करत आहे. येत्या 15 मार्चपर्यंत यासंदर्भात निर्णय होऊ शकतो.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती कमी करण्यासाठी देशातील विविध राज्य, तेल कंपन्या आणि वित्त मंत्रालयासोबत चर्चा करत आहेत. या चर्चेतून मार्ग निघण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काही राज्यांमध्ये पेट्रोल प्रतिलिटर 100 रुपयांवर पोहचले असून, सर्वसामान्य जनतेला या इंधन दरवाढीचा मोठा फटका बसत आहे. इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याचे सरकार सांगत आहे. गेल्या दहा महिन्यांत कच्च्या तेलाच्या किंमतीत दुप्पट वाढ झाली आहे. देशात त्यावर जवळपास 60 टक्के एक्साईज ड्युटी लावली जाते. हा कर कमी झाल्यास जनतेला दिलासा मिळेल.









