नवी दिल्ली : पेट्रोलमध्ये मिसळण्यात येणाऱया इथेनॉलच्या प्रमाणामध्ये या महिन्यापासून वाढ करण्यात येणार असल्याचे अधिकाऱयांकडून सांगण्यात येत आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे प्रमाण आता 8.5 टक्के इतके असणार असल्याचे सूत्रांकडून समजते. 2020-21 व्यापारी वर्षाकरता या महिन्यापासून इथेनॉलचे प्रमाण वाढवले जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी हे प्रमाण 4.8 टक्के इतके होते. 2018 च्या इंधन धोरणानुसार इथेनॉलचे प्रमाण 2030 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्क्मयांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यादृष्टीने सरकार पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण टप्प्याटप्प्याने वाढवत आहे. 2022 पर्यंत पेट्रोलमध्ये दहा टक्केपर्यंत इथेनॉलचे प्रमाण वाढवले जाणार आहे.
Previous Articleलाज राखली, व्हॉईटवॉश टळला!
Next Article कॅस्ट्रॉल इंडियाच्या सीएफओपदी बक्षी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.