निवडणूक आयोगाचे निर्देश
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
पेट्रोल पंपावरील जाहिरातींमध्ये केंद्र सरकारच्या विविध योजनांसंदर्भातील होर्डिंग्जमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो वापरण्यात आले असल्याने हे सर्व होर्डिंग्ज काढण्याचे आदेश निवडणूक आयोगाने नुकतेच दिले आहेत. यानंतर आता कोरोना लस घेतलेल्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या सर्टिफिकेटवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवावा असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. विरोधकांनी कोरोना लस घेतलेल्या सर्टिफिकेटवरील मोदींच्या फोटोवर आक्षेप नोंदवला होता. याची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला निर्देश देत पंतप्रधान मोदींचा फोटो हटवावा, असे सांगितले आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार डॅरेके ओब्रायन यांनी लसीकरण प्रमाणपत्रावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवर आक्षेप नोंदवला होता.
केंद्रीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुदुच्चेरीमधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला आहे. यानंतर सर्व पक्षीयांच्या प्रचाराला वेग आला आहे. यातच कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. कोरोना लस घेतलेल्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या सर्टिफिकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला आहे. विरोधकांकडून या गोष्टीवर आक्षेप नोंदवला आला आहे. याची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने हे फोटो हटवावा असे निर्देश दिले आहेत.
केंद्र सरकार आचार संहितेचे उल्लंघन करत आहे, असा आरोप तृणमूल काँग्रेसकडून याआधी करण्यात आला होता. मात्र, तो आरोप निवडणूक आयोगाकडून फेटाळण्यात आला. तृणमूल काँग्रेसचे खासदार डॅरेके ओब्रायन यांनी लसीकरण प्रमाणपत्रावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवर आक्षेप नोंदवला होता. पश्चिम बंगालमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र आपल्या अधिकारांचा गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
Previous Articleमनसुख हिरेन यांच्या मृत्यूवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
Next Article उस्मानाबाद : घाटंग्री शिवारात आढळला मृत बिबट्या









