निर्मला सितारमण यांना वाढदिवसानिमित दिल्या हटके शुभेच्छा
ऑनलाईन टीम / मुंबई
भारताच्या अर्थमंत्री निर्मला सितारामण यांचा आज ६२ वा वाढदिवस आहे. त्यांना देशातील अनेक मान्यवरांनी या बद्दल शुभेच्छा दिल्या. अशाच शुभेच्छा राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी दिल्या, पण थोड्या हटके. देशभरातील नागरिकांना ज्या प्रश्नाने हैराण केले आहे. अगदी त्यावरच बोट ठेवत या शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या ट्विटर हँडेलवरुन निर्माला सितारमण यांना टॅग करत ”देशाची तिजोरी सक्षमपणे सांभाळणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सितारामण जी आपल्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपण पेट्रोल-डिझेलच्या दराप्रमाणे आयुष्याचं शतक पार करावं आणि त्यासाठी आपणास उत्तम आरोग्य लाभावं, ही प्रार्थना” असं रोहित पवार यांनी म्हटले आहे. सितारामण यांना दिलेल्या शुभेच्छांमुळे रोहित पवार यांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. एक तर सितारामण यांना शुभेच्छा दिल्या, आणि वाढत्या इंधन दरवाढीवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
सितारामण यांनी इंधन दरांमध्ये घट होण्याची शक्यता कमी असल्याचे मत व्यक्त केलं होतं.
“काँग्रेसप्रणित युपीए सरकारने १.४४ लाख कोटी रुपयांचे ऑइल बॉण्ड जारी करून इंधनाचे दर कमी केले होते. मी तशी चालबाजी करू शकत नाही. युपीए सरकारने घेतलेल्या निर्णयाचा भार सरकारी तिजोरीवर पडला आहे. त्यामुळे इंधन दरात घट होणं कठीण आहे,” असं अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी स्पष्ट केले आहे.