नवी दिल्ली
ऑनलाईन गुंतवणूक आणि पैशांच्या देवघेवसंदर्भात कार्य करणाऱया पेटीएम मनीच्या नव्या सीईओपदी वरूण श्रीधर यांची नियुक्ती करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी देश आणि विदेशातील अनेक बडय़ा रिटेल बँकांमध्ये काम केले आहे. अलीकडच्या काळात ते फिनशेल इंडियाच्या सीईओपदी कार्यरत होते. त्यांनी रियलमी पैसा योजना लॉन्च करून त्याच्याअंतर्गत म्युच्युअल फंड, पेडिट स्कोर, बिझनेस लोन, पर्सनल लोन अशा सुविधा राबवल्या होत्या. रिटेल बँकिंग, ब्रोकिंग आणि संपत्ती व्यवस्थापन गटातील त्यांचा अनुभव पेटीएमला फायद्याचा ठरेल असे कंपनीला वाटते आहे.









