वाहतूकमंत्री माविन गुदीन्हो यांची माहिती पणजीत ट्राफिक सिग्नलचे उद्घाटन
प्रतिनिधी / पणजी
राजधानितील दयानंद बांदोडकर मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पॅसीनोंची कार्यालये सांता मोनिका जेटीर हलविणे काळाची गरज. असे वाहतूक मंत्री मावीन गुदीन्हो यांनी सांगितले. याबाबत आमचे प्रयत्न सुरु आहेत. स्थानिक आमदार बाबूश मोन्सेरात, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच महानगर पालीकेशी बोलणी झाली असल्याचेही वाहतूकमंत्री म्हणाले.
पणजीत विविध ठिकाणी उभारलेल्या ट्राफिक सिग्नलचे उद्घाटन कार्यक्रमात वाहतूकमंत्री माविन गुदीन्हो प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. माधव प्रसाद बिर्ला ग्रूपने पणजीत विविध ठिकाणी उभारण्यासाठी मनपाल ट्राफिक सिग्नल पुरस्कृत केली असून ट्राफिक सिग्नील उभारण्या पासून ते सुरु करेपर्यंतचा खर्च माधव प्रसाद बिर्ला ग्रूपने केला आहे. गुरुवारी वाहतूक पोलीस विभाग व मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात या सिग्नलचे रीतसर उद्घाटन करण्यात आले. यावेळी वाहतूक मंत्री माविन गुदीन्हो यांच्या सोबत वाहतूक संचालक राजन सातार्डेकर, महापौर उदय मडकईकर, उपमहापौर वंसत आगशीकर व इतर मान्यवर उद्घाटन कार्यक्रमात व्यसपीठावर उपस्थित होते.
पुढे बोलताना माविन गुदीन्हो म्हणाले की पणजी ही गोव्याची राजधानी असल्याने राजधानीचा सर्वतोपरीने विकास होणे फार महत्वाचे आहे. वाहतूक खात्याकडून लागणारी सर्व मदत द्यायला आपण तयार आहे. येथील दायनंद बोदोडकर मार्गावर अधिकाधिक पॅसिनोची कार्यालये असल्याने पॅसिनोत येणाऱयांची वाहने भररस्त्यावर उभी केली जातात एकूणच वाहतूकीस अडथळा निर्माण होतो. म्हणूनच ही सगळी पॅसिनोंची कार्यालयेत सांता मोनिका जेटीवर हलविल्यास त्यांची वाहने पार्कींग काँप्लेसमध्ये पार्क करणे शक्य. अधिकाधिक वाहन चालक आपली खाजगी वाहने कदंबा बसस्थानकाच्या परीसरात पार्क करण्यास इच्छूक असतात परंतू मार्केट किंवा पुढे मिरामार पर्यंत कसे जायचे असा त्यांच्या समोर प्रश्न असतो. हा प्रश्न सुटल्यास पणजी मार्केटमध्ये होणारी वाहतूकीची कोंड सहज सुटणार. थोडय़च दिवसांनी वाहतूक खात्याकडे ईलेक्ट्री बसेस येणार असून त्यांचा वापर पणजी बसस्थानक ते मिरामार पर्यंतच्या वाहतूकीसाठी वापर करण्यात येणार असल्याचेही गुदीन्हो यांनी सांगितले. महापार मडकईकर स्वगतपर भाषणात म्हणाले की. माधव प्रसाद बिर्ला ग्रूप यांनी सिग्नाल पुरस्कृत करून मोठे सहाय्य केले आहे. अशाच कंपनीने पुढे यावे व विकासासाठी सहकार्याचे हात पुढे करावे. पणजी परीसरात शिस्तबध्द पार्कींग व्हावी जेणेकरुन वाहतूकीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी मनपा दिवस रार्त्र कार्य करीत आहे. त्यासाठी वाहतूक पोलीस तसेच इतर पेलिसांचे सहकार्य मिळत आहे. या सर्वांचे मडकईकरक यांनी आभार मानले.









