वृत्तसंस्था/ पॅरीस
2021 सालातील पॅरीस आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ही ठरलेल्या वेळेप्रमाणेच घेतली जाईल, अशी घोषणा मंगळवारी स्पर्धा आयोजकांनी केली आहे. 2021 ची पॅरीस मॅरेथॉन ठरलेल्या वेळापत्रकानुसार 17 ऑक्टोबर रोजी घेतली जाईल.
कोरोना महामारी समस्येमुळे 2020 सालातील पॅरीस मॅरेथॉन रद्द करण्यात आली होती. त्याचप्रमाणे पुढीलवर्षी हाफ मॅरेथॉन 5 सप्टेंबर रोजी घेती जाईल, असे ऍमेरी स्पोर्टस् अँार्गनायझेशनने (एएसओ) सांगितले. 2020च्या पॅरीस मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी ज्या धावपटूशी करार करण्यात आला आहे. त्यांना 2021 च्या पॅरीस मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. प्रत्येक वर्षी पॅरीस मॅरेथॉनमध्ये किमान 50 हजार धावपटू सहभागी होत असतात. 2020च्या कालावधीत कोरोना महामारी समस्येमुळे न्यूयॉर्क, बर्लीन, बोस्टन आणि शिकागो मॅरेथॉन रद्द करण्यात आल्या तर लंडन आणि टोकियो मॅरेथॉन इलाईट धावपटूंसाठी खुली करण्यात आली होती.









