ऑनलाईन टीम / पॅरिस :
लॉकडाऊनच्या तीन महिन्यांच्या कालावधीनंतर पॅरिस येथील जगप्रसिद्ध आयफेल टॉवर पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच देशातील अर्थव्यवस्थेची घडी विस्कटली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या सर्वच देशांनी लॉकडाऊनच्या नियमांत शिथिलता आणली आहे. फ्रान्सनेही लॉकडाऊनच्या नियमात शिथिलता आणली असून, पर्यटनाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आयफेल टॉवर पर्यटकांसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला आहे.
दुसऱ्या महायुद्धानंतर दीर्घ काळ आयफेल टॉवर बंद राहण्याची ही दुसरी वेळ आहे. आता आयफेल टॉवर खुला करण्यात आला असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. टॉवरचा दुसरा मजला सध्या बंद ठेवण्यात आला आहे. पर्यटकांना लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करावा लागत आहे. तसेच 11 वर्षापुढील सर्वांना मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे.









