ऑस्करप्राप्त ‘पॅरासाइट’ चित्रपटातील अभिनेत्री पार्क सो डॅम सध्या कर्करोगाशी झुंजत आहे. पॅपिलरी थाइरॉइड कॅन्सरने पार्क ग्रस्त आहे. पार्कच्या आजारामुळे तिचा पुढील चित्रपट ‘स्पेशल डिलिव्हरी’च्या प्रमोशनचे काम रोखण्यात आले आहे.
पार्कवर अलिकडेच शस्त्रक्रिया झाली असून त्यातून ती बरी होत आहे. अभिनेत्री पार्क सो डॅम हिच्या नियमित आरोग्य तपासणीदरम्यान पॅपिलरी थाइरॉयड कॅन्सर झाल्याचे निदान झाले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

बहुप्रतीक्षित चित्रपट ‘स्पेशल डिलिव्हरी’ लवकरच झळकणार असल्याने अभिनेत्री स्वतःच्या आजारपणामुळे उदास झाली आहे. अभिनेत्री ‘स्पेशल डिलिव्हरी’च्या प्रमोशनमध्ये सामील होणार नसली तरीही तिने चित्रपटाच्या प्रीमियरसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पार्क सध्या स्वतःच्या प्रकृतीवर लक्ष केंद्रीत करत आहे. ‘स्पेशल डिलिव्हरी’ हा चित्रपट 12 जानेवारी रोजी जगभरात झळकणार आहे.









