टोकियो: टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत आजचा दिवस भारतासाठी ऐतिहासिक ठरला आहे. टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची महिला नेमबाज अवनी लेखराने आज १० मीटर एअर रायफलच्या क्लास 1 मध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्यानंतर भारताच्या सुमित अँटिलने यावर्षीचे देशासाठीचे दुसरे सुवर्णपदक पटकावले आहे. सुमितने भाला फेकण्याच्या F64 स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वी झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या नीरज चोपड़ा ने भाला फेकमध्ये १०० वर्षांनंतर भारताला अॅथलेटिक्समध्ये सुवर्ण पदक मिळवून दिल आहे.
दरम्यान टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा सर्वोत्तम खेळ सुरू आहे. सोमवारी सकाळी अवनी लखेडा हिने 10 मीटर एअर रायफलच्या वर्ग SH1 स्पर्धेत सुवर्ण जिंकून भारताला यंदाच्या पॅरालिम्पिकमधील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. दरम्यान, या दिवशी भारताचे दुसरे सुवर्णपदकही या वर्षीच्या पॅरालिम्पिकमध्ये आले आहे. भारताच्या सुमित अँटिलने भाला फेकण्याच्या F64 स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.
भारताचा भालाफेकपटू सुमित अँटिलने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताचे दुसरे सुवर्णपदक जिंकले आहे. त्याने हे पदक विश्वविक्रमासह जिंकले आहे. पहिल्यांदा पॅरालिम्पिक खेळणाऱ्या सुमितने भाला फेकण्याच्या F-64 स्पर्धेच्या दुसऱ्या प्रयत्नात 68.08 मीटरचा विश्वविक्रम फेकला. एवढेच नाही तर त्याने आपल्या पाचव्या प्रयत्नात त्यात आणखी सुधारणा केली आणि 68.55 मीटर फेकून विश्वविक्रम केला.
Previous Articleठाकरे सरकारच्या बघ्याच्या भूमिकेमुळे ओबीसी आरक्षण टांगणीवर
Next Article हिवताप विभागाकडून शहरात 400 ठिकाणी भेटी









