ऑनलाईन टीम / काबुल :
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा नेमबाज सिंहराज अधाना याने पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल एसएच 1 फायनलमध्ये कांस्यपदकाची कमाई केली. या खेळात 237.9 गुणांसह चीनच्या चाओ यांगने सुवर्णपदकाला गवसणी घातली. जिंग हुआंग या चिनी खेळाडूने 237.5 गुणांसह रौप्यपदक पटकावले. तर सिंहराज अधानी याने 216.8 गुणांसह कांस्यपदक जिंकले.
पॅरालिम्पिकमध्ये सोमवारी भारताची महिला नेमबाज अवनी लेखरा हिने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. त्यामुळे सिंहराजला नेमबाजीत मिळालेले हे भारतासाठी दुसरे पदक आहे.