ऑनलाईन टीम / टोकियो :
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये उंच उडी प्रकारात नोयडाच्या प्रवीण कुमारने रौप्यपदकावर नाव कोरले. पुरुष उंच उडी टी-64 गटात 2 मीटर उंच उडी घेत प्रवीणने ही कमाई केली. या स्पर्धेत ग्रेट ब्रिटनच्या ब्रूम-एडवर्ड्स जोनाथन यानं 2.10 मीटर उडी घेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. तर पोलंडच्या लेपियाटो मासिएजो कांस्य पदकाची कमाई केली.
उंच उडी प्रकारातील भारताचे हे चौथे पदक आहे. यापूर्वी उंच उडीत टी-63 गटात भारताच्या मरियप्पन थंगावेलु यानंही रौप्य पदकाची कमाई केली आहे. शरद कुमारने कांस्य पदकाची तर निषाद कुमारने टी-47 गटात नवा आशियाई रेकॉर्ड प्रस्थापित करत रौप्य पदक जिंकलं आहे. भारताने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये आतापर्यंत 11 पदक मिळविले आहेत.









