हैद्राबाद : भारतातील इलेक्ट्रिकल कन्स्ट्रक्शन मटेरिअल्सची (ईसीएम) सर्वात मोठी स्थानिक उत्पादक कंपनी असलेल्या पॅनासोनिक
लाईफ सोल्यूशन्स इंडियाने गुरुवारी हैद्राबादमध्ये त्यांच्या पहिल्या एक्सक्लुसिव्ह बँड स्टोअरचे उद्घाटन केले आहे.
या ब्रँड स्टोअरमध्ये दर्जात्मक अँकर व पॅनासोनिक उत्पादनांचा समावेश असेल. ज्यामध्ये निवासी, व्यावसायिक व औद्योगिक विभागांसाठी प्रगत इलेक्ट्रिकल वायरिंग डिवाईसेस, स्विचगिअर, वायर्स, एलईडी लायटिंग सोल्यूशन्स, आयएक्यू (पंखे) आणि वॉटर हिटर्स अशा दर्जात्मक उत्घ्पादनांचा समावेश आहे.
कंपनीचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक विवेक शर्मा म्हणाले की, ईसीएम उद्योगक्षेत्राच्या वाढत्या गरजांची पूर्तता करण्यासाठी आमचा आर्थिक वर्ष 2021-22च्या अखेरपर्यंत भारतातील प्रथम व द्वितीय श्रेणीच्या बाजारपेठांमध्ये अशाप्रकारची 130 स्टोअर्स सुरू करण्याचा प्रयत्न आहे. हे स्टोअर्स ग्राहक व प्रभावकांसाठी एक्स्पेरिअन्स सेंटर्स म्हणून सेवा देतील.









