पुलाची शिरोली/वार्ताहर
महाराष्ट्र सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना फक्त पॅकेजची घोषणा न करता भरपाईची तरतूद करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केली. पुलाची शिरोली येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केली. यावेळी ते बोलत होते. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. शौमिका महाडीक, हातकणंगले तालुका भाजपचे अध्यक्ष राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना घाटगे म्हणाले, भाजपचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दहा हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले होते. त्यावेळी विरोधात असलेले व सध्याच्या सत्ताधारी आघाडी सरकारने टीका केली होती. पण या वर्षी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची अद्याप तरतूद केलेली नाही. फक्त मंत्र्यांची घोषणाबाजी सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा घाटगे यांनी यावेळी दिला.
महात्मा फुले कृषी सन्मान योजनेअंतर्गत गेल्यावर्षी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आघाडी सरकारने मदतीची घोषणा केली होती. या योजनेतून शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. त्यामुळे सरकारची अकार्यक्षमता दिसून आली आहे.
भाजपचे शहराध्यक्ष संभाजी भोसले यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे पुर्ण करण्याची संबंधितांना सुचना देणेची मागणी केली. तसेच शेतकरी युनूस मुल्ला यांनी शिरोलीत ऊस तोडणी मजुरांची संख्या वाढवून देण्याची मागणी केली.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, पंचायत समिती सदस्य डॉ. सौ. सोनाली पाटील, अजिंक्य इंगवले, भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष भगवानराव काटे, वडगाव बाजार समितीचे माजी चेअरमन सुरेश पाटील, कृष्णात खवरे ,बबनराव संकपाळ , डॉ. सुभाष पाटील, सौ. पुष्पा पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष सतीश पाटील ,गावकामगार तलाठी निलेश चौगुले ग्राम विकास अधिकारी कठारे, माजी उपसरपंच कृष्णात करपे, उदय पाटील ,विकास सोसायटीचे व्हा. चेअरमन मदन संकपाळ, श्रीकांत खटाळे, निशिकांत पद्माई , दिलीप कौंदाडे, एकनाथ संकपाळ, संदीप पोर्लेकर यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









