ऍलन मस्क यांचा इशारा
पृथ्वीवरील सर्वात धनाढय़ व्यक्ती ऍलन मस्क यांनी माणसाने लवकरात लवकर पृथ्वी न सोडल्यास आणि अन्य ग्रहांचा प्रवास सुरू न केल्यास मानवी अस्तित्व संपणे निश्चित असल्याचा इशारा दिला आहे. पुढील 10 वर्षांमध्ये पृथ्वीपासून सर्वात जवळचा ग्रह मंगळावर पाऊल ठेवून तेथे मानवी वस्ती निर्माण करण्याचे काम सुरू करण्याची स्पेस एक्स या कंपनीचे अध्यक्ष मस्क यांची आहे.

स्वयंचलित शहर
मंगळ ग्रहावर स्वतःहून संचालित होणारी शहरे निर्माण करावी लागणार आहेत. अशाप्रकारची शहरे निर्माण करूनच आम्ही मानवी ‘चेतना’ दीर्घकाळापासून वाचवू शकतो. ब्रह्मांडात कोटय़वधी वर्षांपर्यंत विकास केल्यावर अंतर्गत किंवा बाहय़ कारणांमुळे नष्ट झालेल्या अनेक संस्कृती आहेत. सर्व संस्कृतींचा विकास होतो, ते तांत्रिक गुंतागुंतीत पुढे जातात, पण त्यानंतर त्यांची वाटचाल थांबते आणि त्यांचे पतन सुरू होते असे उद्गार मस्क यांनी काढले आहेत.
पिरॅमिड, रोमन साम्राज्याचा दाखला
इजिप्तमध्ये सुमारे 5 हजार वर्षांपूर्वी गिजाचे एक महान पिरॅमिड होते. पण कालौघात तेथे राहणाऱया लोकांना पिरॅमिड कसे उभारावे याचाच विसर पडला. अशाप्रकारची शिकवण रोमन साम्राज्य, सुमेरियन आणि बेबीलॉन संस्कृतीतूनही मिळते. पृथ्वीला बाहेरूनही धोका असल्याचे मस्क म्हणाले.
आतापर्यंत 5 वेळा प्रलय
पृथ्वीच्या इतिहासात 5 वेळा ‘प्रलय’ आला असून त्यात सर्वकाही नष्ट झाल्याचे वैज्ञानिकांचे मानणे आहे. पृथ्वीवर प्रलय येत राहतो आणि हा एक चक्राचा हिस्सा आहे. पृथ्वीबाहेरही जीवसृष्टीची शक्यता आहे, एका ग्रहावरून दुसऱया ग्रहावर जात राहता येऊ शकते, पण या संधीसाठी अत्यंत कमी कालावधी राहिल्याचा दावा मस्क यांनी केला आहे.









