प्रतिनिधी /बेळगाव
पृथ्वीसिंग फौंडेशन व डॉ. सोनाली सरनोबत यांच्या सहकार्याने विनायकनगर येथे शुक्रवारी लसीकरण मोहीम पार पडली. याप्रसंगी खासदार मंगला अंगडी उपस्थित होत्या. डॉ. सरनोबत यांनी सर्वांना लस दिली. यावेळी विलास पै, भैरू पाटील, विनायकनगर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी व फौंडेशनचे कर्मचारी उपस्थित होते.









