कुटुंबीयांशीं चर्चा करणे उत्तम उपाय
आम्हाला पूर्वजांकडून गुणसूत्रांद्वारे रंग-रुप, सवयी आणि वर्तनच नव्हे तर ट्रॉमा देखील मिळतात आणि याचा प्रभाव व्यापक असतो. फॅसिलिटेटर आणि प्रसिद्ध लेखक थॉमस हबल यांनी स्वत:चे नवे पुस्तक ‘एट्यून्ड : प्रॅक्टिसिंग इंटरडिपेंडेंस टू हील अवर ट्रॉमा-अँड अवर वर्ल्ड’मध्ये हा दावा केला आहे. जगातील जटिल आव्हानांचा सामना करण्यासाठी आम्हाला या ट्रॉमाची ओळख पटवून तो दूर करण्याची गरज असल्याचे हबल यांचे म्हणणे आहे.

पाश्चिमात्य जगतात आम्ही अस्तित्वाकडे स्वतंत्र स्वरुपात पाहतो, परंतु आम्ही पूर्वीच्या अनेक पिढ्यांचा हिस्सा असतो. आमचे शरीर शेकडो-हजारो वर्षांच्या जीवनापासून तयार झालेले आहे, सर्व पूर्वज आमच्या अस्तित्वात काही ना काही जोडत असतात, असे हबल यांनी म्हटले आहे.
तर्कसंगत विचार, भावनात्मक जटिलता, शारीरिक कार्य, आत्म-उपचार पूर्वजांकडून प्राप्त होत असतो. परंतु यात ट्रॉमाला सामील करण्यात आलेले नाही, तर अत्याधिक सतर्कता, तणाव आणि भीतीच्या स्वरुपात ते पुढील पिढीपर्यंत पोहोचू शकते.
डीएनए वेगळ्या पद्धतीने सक्रीय
वैज्ञानिकदृष्ट्या याला एपिजेनेटिक्सद्वारे पाहू शकतात. यामुळे डीएनए कशाप्रकारे जिवंत अनुभवांच्या आधारावर वेगवेगळ्या पद्धतीने सक्रीय होऊ शकतो हे स्पष्ट होते. नव्या संशोधनात ज्या उंदरांना आघात पोहोचला, ते स्वत:च्या पाचव्या-सहाव्या पिढीपर्यंत लक्षणे फैलावत राहिल्याचे दिसून आले आहे. माणसांमध्ये ट्रॉमा अनेकदा अतिरंजित प्रतिकाराच्या स्वरुपात व्यक्त केला जातो. यात आक्रमकता आणि समस्येसाठी जबाबदार व्यक्तींवर हल्ला असू शकतो. याचबरोबर एक लक्षण म्हणजे उदासीन अन् एकाकी पडणे असू शकते. अशाप्रकारचा ट्रॉमा झेलत असलेल्या लोकांमध्ये एंक्झाइटी डिसऑर्डर, नैराश्य आणि अमली पदार्थांचे सेवन इत्यादी वृत्ती प्रामुख्याने दिसून येते. यापैकी कुठलेही लक्षण किंवा मानसिक स्थिती अनुभवली जात असल्यास हा पूर्वजांकडून प्राप्त ट्रॉमा असू शकतो. अशाप्रकारचे ट्रॉमा सहन करत असलेले लोक पिढीगत ट्रॉमा संपविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात, असे तज्ञांनी सांगितले आहे.
इतरांनाही प्रेरित करा
पूर्वजांकडून सहन करण्यात आलेल्या दु:खाला दूर करणे शक्य नाही. परंतु पिढीगत ट्रॉमाचे चक्र तोडणे आणि आगामी पिढ्यांसाठी उत्तम मानसिक आरोग्यासाठी प्रयत्न केला जाऊ शकतो. कुटुंबात खुली चर्चा व्हावी आणि भावना व्यक्त करण्यास चालना मिळणे गरजचे आहे. मानसिक आरोग्याशी निगडित समस्यांवर उपाय शोधावा आणि इतरांनाही याकरता प्रेरित करावे. शरीराशी जोडले जाण्याचा सराव करावा, यामुळे तणावाचे केंद्र शोधता येते. तणावरहित क्षणांमध्ये शारीरिक जागरुकता निर्माण करण्यास मदत मिळते असे हबल यांनी म्हटले आहे.









