इस्लामपूर- प्रतिनिधी
पश्चिम महाराष्ट्रातील पूराचा धोका टाळण्यासाठी कालपासूनच प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. काल संध्याकाळपासूनच अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत आहे. धरणांच्या पाण्याच्या विसर्गाचे योग्य नियोजन केले जात आहे. तसेच पूरनियंत्रणासाठी कठोर उपाययोजनाही केल्या जात असल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.








