ऑनलाईन टीम / लेह :
पूर्व लडाखमध्ये चिनी हेलिकॉप्टर्सच्या हालचाली वाढल्या आहेत. त्यांनी हवाई हद्दीचे उल्लंघन केल्यास तात्काळ प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने उंचावरील प्रदेशात इग्ला एअर डिफेन्स सिस्टिमसह जवानांना तैनात केले आहे.
शत्रूची फायटर विमाने किंवा हेलिकॉप्टर्स युद्धकाळात जेव्हा आपल्या जवळ येतात, तेव्हा इग्ला एअर डिफेन्स सिस्टिम महत्वाची भूमिका बजावते. इग्ला एअर डिफेन्स सिस्टिम रशियन बनावटीची आहे.
चीनची लढाऊ हेलिकॉप्टर्स भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यावर रडारच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाते. तसेच भारताने युद्धसज्जताही ठेवल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.









