मुंबई
मुळची बेंगळूरची असणारी कंपनी पूर्वांकाराने आता मुंबईत प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. बांधकाम क्षेत्रातील या दिग्गज कंपनीने लवकरच मुंबईत अल्ट्रा लक्झरी बांधकाम प्रकल्प साकारण्याचे निश्चित केले आहे. 450 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा हा प्रकल्प मुंबईच्या चेंबूर उपनगरामध्ये उभारला जाणार आहे. यामध्ये चार टॉवर्सची उभारणी केली जाणार असून प्रकल्पात 2 बीएचके, 3 बीएचकेसह विविध आकाराचे फ्लॅटस् असतील. 2.25 एकर क्षेत्रफळाच्या जागेची मालकी कंपनीने नुकतीच प्राप्त केली असून सदरच्या प्लॉटवर रहिवासी व व्यावसायिक असा मिश्र प्रकल्प आकाराला येणार आहे.









