प्रतिनिधी / बेळगाव :
कामगारांना पूर्वसुचना किंवा नोटीस न देता अचानकपणे कारखाना बंद केल्याची नोटीस कारखान्याच्या प्रवेशव्दारावर लावण्यात आली. त्यामुळे कंग्राळी बुद्रुक येथील रफीया पॉलीमेअर्स कारखान्यातील कामगार बेरोजगार झाले. त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेवून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी निवदेनाव्दारे केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या फॅक्टरीमध्ये आम्ही काम करत आहे. असे असताना अचानकपणे फॅक्टरी बंद केल्याचे नोटीस लावण्यात आली. यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आम्ही जवळपास 40 हून अधिक जण आहे. 20 वर्षे काम करत आहे. कोविड-19 आले म्हणून अचानकपणे कारखाना बंद करणे योग्य नाही. जाणूनबुजून कारखाना मालकाने हा प्रकार केला आहे. तरी याची सखोल चौकशी करुन आम्हाला न्याय द्या, अशी मागणी केली आहे.
शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आप्पासाब जकाती, मारुती मोरे, सतीश कुंभाजी, रामलिंग निलुगळ, सामाजिक कार्यकर्ते कदीम बेपारी, दीपक पाटील, संग्राम मुरमु, लक्ष्मण किसकु, अंजना तरळे, मालु मठद, लक्ष्मी पाटील, प्रभावती पाटील, सविता शिंदे, मिनाक्षी बनसण्णावर यांच्यासह कामगार उपस्थित होते.









