प्रतिनिधी / सावंतवाडी:
अहमदाबाद-गुजरात येथे घेण्यात येणाऱया ऑल इंडिया जी. व्ही. मावळणकर नेमबाजी स्पर्धेत सिंधुदुर्गच्या 12 नेमबाजांची निवड झाली. ही स्पर्धा 10 ते 30 ऑक्टोबरपर्यंत घेण्यात येणार आहे.
यात 10 मीटर एअर रायफल प्रकारात कु. संजना अमोल बिडये (सावंतवाडी), कु. शमित श्याम लाखे (सावंतवाडी), कु. सानिया सुदेश आंगचेकर (वेंगुर्ले), कु. वैष्णवी गोविंद भांगले (बांदा), कु. शार्दुल सुधीर शिरसाट (बांदा), तर 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कु. साईश दिगंबर तळनकर (दोडामार्ग), कु. आयुष दत्तप्रसाद पाटणकर (सावंतवाडी), कु. स्वानंद प्रशांत सावंत (सावंतवाडी), कु. प्रतीक्षा प्रशांत सावंत (सावंतवाडी), शैलेश विष्णू सावंत (सावंतवाडी) हे खेळाडू महाराष्ट्र संघाचे प्रतिनधीत्व करतील. तर याच क्रीडा प्रकारात कु. श्रीया अतुल नाखरे व 25 मीटर पॉईंट 22 पिस्तूल प्रकारात अतुल लक्ष्मण नाखरे यांची निवड गोवा राज्य संघातून झाली. सर्व नेमबाज उपरकर शूटिंग अकॅडमी सावंतवाडी, बांदा व वेंगुर्ले येथे सराव करत आहेत. त्यांना प्रशिक्षक कांचन उपरकर यांचे प्रशिक्षण लाभले असून आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विक्रम भांगाले यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. जिल्हा शूटिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱयांनी निवड झालेल्या सर्व नेमबाजांचे अभिनंदन केले. 1









