प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिह्यातील पूरबाधित ऊस तातडीने तोडला पाहिजे. तो कधी तोडणार, तोडी कधी संपवणार यासाठी वेळापत्रक तयार करावे. ऊसतोड मजूर व कारखान्यांच्या कामगारांना कोरोना प्रतिबंधक लस शंभर टक्के दिली पाहिजे. तसेच शंभर टक्के मतदार नोंदणी करण्याची जबाबदारी कारखाना प्रतिनिधींची आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात ऊस कारखान्यांच्या प्रतिनिधींसोबतच्या बैठकीत ते बोलत होते.
रेखावार म्हणाले,“जिह्यात पूरबाधित उसाची तोडणी नियोजित वेळेत झाली झाली पाहिजे. ऊस वाहतुकीसाठी रस्ते खराब असल्यास त्याची माहिती साखर सहसंचालक कार्यालयाकडे लेखी द्यावी. ऊसतोड कामगार, मुकादम, ऊस वाहतूकदार व कारखान्यातील कामगारांचे शंभर टक्के लसीकरण झाले पाहिजे. यासाठी कारखान्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. जिल्हÎात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. मात्र लसीकरण शंभर टक्के केल्याशिवाय पर्याय नाही. साखर कारखान्यांनी मतदार नोंदणीसाठाही सहकार्य करण्याचे आवाहन केले. दरम्यान, आमदार प्रकाश आवाडे यांनी जेथे ऊस तोडण्यास अडथळा आहे, अशा ठिकाणी मशिन वापरावे लागणार असल्याचे सांगितले.