बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात अनेकठिकाणी मुसळधार पावसमीउळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाले आहे. आदरम्या, आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी राज्यातील पूरग्रस्तांमध्ये आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
शुक्रवारी आरोग्य आरोग्य मंत्रालयात मंत्र्यांनी शुक्रवारी वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन पूरविरोधी लढाईत आरोग्य विभागाच्या सज्जतेचा आढावा घेतला. पूरग्रस्त जिल्ह्यात जंतुनाशक फवारणी करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यांना लोकांना संभाव्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यास सांगितले गेले आहे.
दरम्यान, पूरात ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि मुलांसारख्या असुरक्षित घटकांवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, असे सुधाकर म्हणाले. “कोविडची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. पूर निवारण केंद्रांमधील लोकांना मोफत मास्क आणि सॅनिटायझर्स वितरीत केले जातील याची काळजी घ्या. ” यावर्षी चिकनगुनिया आणि डेंग्यूसारख्या संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी झाला आहे पण येत्या काही दिवसांत कोणत्याही प्रकारची वाढ होण्याबाबत विभागाने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
पूर मदत केंद्राजवळ प्राथमिक आरोग्य केंद्रे किंवा सरकारी रुग्णालये नसल्यास मोबाईल हेल्थ युनिटचा वापर करण्याचे अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधण्यासाठी विभागाने नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.









