वार्ताहर / पुसेसावळी
पुसेसावळीत भरारी पथकाच्या कारवाईने सुमारे 7 हजार 900 रुपयांची दंड करण्यात आला. रविवारी पुसेसावळीत भरारी पथक दाखल झाले. विनामास्क फिरणाऱ्या ग्राहकांना तसेच दुकानदारांना त्यासंबंधीचा दंड आकारण्यात आला. तसेच,पोलीसांच्या मदतीने डबलसीट, ट्रिपलसीट जाणाऱ्या दुचाकीस्वारांकडूनही दंड वसूल करण्यात आला. पुसेसावळी गणात विनामास्क फिरणारे तसेच, दुचाकीवरुन डबल सीट प्रवास करणाऱ्या सुमारे 51 जणांवर कारवाई करण्यात आली. काही व्यापाऱ्यांनी पथकाबरोबर वाद देखील घातला. मात्र,पथकाने आपली कारवाई योग्यरित्या बजावली.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिलेल्या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. जे विना मास्क फिरतात त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आणि सोशल डिस्टनन्स न पाळनाऱ्या व्यापाऱ्यांवर दंड करण्यासाठी एक पथक नेमले आहे. त्या पथकाकडून अॅक्टिव्ह मोडवर कारवाई सुरू आहे. या कारवाईने सध्यातरी पुसेसावळीत जागरुकता निर्माण झाली आहे. गेले दोन दिवस ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने ध्वनीक्षेपणाच्या माध्यमातून गावात दवंडी दिली होती.
Previous Articleसोशल डिस्टन्सचा फज्जा उडवणाऱ्या चार दुकानांवर कारवाई
Next Article कोल्हापूर जिल्ह्यात ३७ नव्या कोरोनाबाधितांची भर








