अल्लू अर्जुनचा गाजणारा चित्रपट
अल्लू अर्जुनचा चित्रपट ‘पुष्पा ः द राइज’च्या हिंदी व्हर्जनचा ओटीटी प्रीमियर शुक्रवारी म्हणजेच 14 जानेवारी रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर होणार आहे. या चित्रपटाचा तेलगू व्हर्जन पूर्वीच ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये 17 डिसेंबर रोजी झळकला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे.
जगभरातील देशांमध्ये स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर तेलगू, तमिळ, मल्याळी आणि कन्नडमध्ये हा चित्रपट पूर्वीच उपलब्ध झाला आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदाना आणि फहद फासिल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. समांथा रुथ प्रभूचे या चित्रपटातील गाणे अत्यंत प्रसिद्ध झाले आहे. या चित्रपटाने देशभरात मोठा गल्ला कमविला आहे. दाक्षिणात्य राज्यांसह हिंदी भाषिक राज्यांमध्येही या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाच्या दुसऱया भागाची आता आतुरतेने प्रतीक्षा केली जात आहे.









