वार्ताहर / पुलाची शिरोली
समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर व पंचायत समिती हातकणंगले यांच्या सेस फंडाच्या माध्यमातुन शिरोली जिल्हा परिषद मतदारसंघातील दिव्यांग लाभार्थ्यांना आर्थिक मदतीचा धनादेश वितरण कार्यक्रम हातकणंगले पंचायत समिती सदस्या डॉ. सोनाली सुभाष पाटील यांचे हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना पाटील म्हणाल्या, कोरोना या संसर्गजन्य विषाणुमुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. याच काळात दिव्यांग व्यक्तींना तातडीची आर्थिक मदत देऊन सहकार्य केले बद्दल प्रशासनाचे आभार मानते व यापुढील काळात ही मतदारसंघातील विकास कामांना प्राधान्य देण्यास आम्ही कटीबद्ध आहोत असे पाटील यांनी सांगितले.
यावेळी माजी सरपंच अनिल शिरोळे, उत्तम पाटील, संतोष यादव, आरिफ सर्जेखान, शामराव पाटील, धनाजी यादव, सचिन गायकवाड, संदीप तानवडे, योगेश खवरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Articleकोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर उत्तर कोरियात आणीबाणीची घोषणा
Next Article कर्नाटकचे वनमंत्री आनंद सिंग यांना कोरोनाचा संसर्ग








