पुलाची शिरोली /वार्ताहर
व्यंकटेश्वर नगर पुलाची शिरोली येथे सरिता सागर वाघवे वय वर्षे ३० या महिलेने किचन रूम मधील लोखंडी हुकाला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी पाच च्या सुमारास घडली.
याबाबत शिरोली पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की ,वाघवे ही महिला वेंकटेश्वर नगर येथील रहिवाशी असून तिने विष प्राशन करून किचन रूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना घरातील नातेवाईकांना समजतात त्यांनी तिला जखमी अवस्थेत कोल्हापुरातील सरकारी दवाखान्यात दाखल केले. पण उपचारापूर्वीच ती मयत झाली. आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही .
या घटनेची नोंद शिरोली पोलिस ठाण्यात झाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
Previous Articleकोल्हापूर : दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या
Next Article दुग्ध व्यवसायातून पाच लाखाचा बोनस









